काल फ़ेसबुकवर एका मित्राने फ़ेरारी सोबत स्वत:चा फ़ोटो लावला होता. माझ्या शेजारी
माझा मुलगा बसला होता. त्याला म्हटले, "तुला हवीये का फ़ेरारी? फ़ोटोपुरती देऊ शकेन मी...!" :-) हा खरंच विनोद नाहीये.
छायाचित्र संपादनाचं तंत्र दिवसेंदिवस इतकं प्रगत होत चाललंय ...काहीही शक्य आहे.
सुरुवातीला पिकासा वर फ़ोटो संपादित करता यायचे. रंगसंगती, प्रकाशयोजना समायोजित करुन ते छायाचित्र छान दिसेल असा प्रयत्न
करता येई. अगदी रंगीत चित्र सेपिया, कृष्णधवल करुन ते
फ़ार पुरातन आहे असे दाखवता येई. वरती ’दिवाळी ग्रिटींग’ वगैरे अक्षरे लिहिता येत. एकूण
आपणच काढलेल्या फ़ोटोचं ग्रिटिंग कार्ड बनवता येई. फ़ोटो कोलाज हा एक सुंदर प्रकार यात
करता येतो. काही फ़ोटो अपलोड करुन आपल्या मित्र मैत्रिणींना सहज पाठवता येईल याची सोय
यात होती, आजही आहे.
मग पिकासाचं पिकनिक नावाचं सॉफ़्टवेअर आलं.
यात सगळी गंमत जंमत होती. म्हणजे कुणाला दाढी-मिशा लावायच्या, कुणाच्या हातात वा चित्रावर केक, फ़ुगे दाखवायचे, कॉनफ़टीजचे रंगीत साबुदाणे
विखुरलेले दाखवायचे, रंगीत फ़िती फ़डकवायच्या
सगळे पॅचेस (ठिगळं) लावता येत होते. शिवाय संत व्हॅलेंटाईनच्या स्मृतीप्रित्यर्थ गुलाबांच्या
बॉर्डर्स, गुलाबाच्या फ़ुलांनी बनलेली हृदयं असलं काही बाही सुद्धा एक कळ
दाबून तयार करणं सोपं होतं. काही पारदर्शक बॉर्डर्स, रंगीत बॉर्डर्स, चित्र छोटं (रिसाईझ)
करणं, हवे तसे कापणे, आकारांची कलाकुसर
आणि बाकी नेहमीच्या गोष्टी (बेसिक फ़िक्सेस) या सगळ्या दृष्टीने नवशिक्याला सहज अवगत
करता येईल असं तंत्र होतं...!
त्यानंतर माझ्या हाती पब्लिशर लागलं..! (मायक्रोसॉफ़्ट ऑफ़िसबरोबर येतं हे) हा चक्क
खजिनाच होता. फ़ोटोंना वेगवेगळे आकार देणं, हव्या त्या बॉर्डर्स
, शिवाय लिखाण त्यासोबत जोडून अगदी घरच्या घरी मुलांच्या प्रोजेक्टचं
काम, आमंत्रण पत्रिका, जाहिराती, फ़्लायर्स काय वाट्टॆल ते बनवणं म्हणजे हातचा मळ वाटावा अशी परिस्थिती
झाली. इथे बर्याच कल्पना तयार मिळू लागल्या (रेडी टेम्प्लेट) आणि फ़ोटोंना अर्थपूर्ण
स्वरूप देता यायला लागलं.
हे सगळं करताना अजून काही तरी हवंय अधिक प्रगत तंत्र गरजेचं आहे असं वाटत होतं.
मग एडोबीचं फ़ोटोशॉप हाती गवसलं. हे सॉफ़्टवेअर मात्र बरंच परिपूर्ण आहे असं वाटतंय.
यात अगदी सहजगत्या छायाचित्राची पार्श्वभूमी बदलता येते किंवा पार्श्वभूमीवर हवा तो माणूस, प्राणी उचलून ठेवता येतो. छायाचित्राच्या हव्या तेव्हढ्याच भागात
रंगसंगती बदलता येते. पार्श्वभूमी पांढरी ठेवता येते, वा रंगांची उधळण करता येते. त्यासाठी बरेच विकल्प उपलब्ध आहेत.
त्याव्यतिरिक्त विशिष्ट भाग उठावदार व बाकीचा पुसट ठेवणे, किंवा मूळ चित्रावर अनेक चित्र ठेवत, थर लावून वेगळे अर्थपूर्ण चित्र बनवणे, पार्श्वभूमी वा
अक्षरलेखन (लेटरिंग) याला त्रिमितीचा आभास निर्माण
करणे यात सहज शक्य आहे. अगदी खरं सांगायचं तर प्रत्यक्ष कागदावर चित्र काढण्याऐवजी
एखाद्या टॅबलेट वर चित्र काढावे वा अनेक फ़ोटो आणि रंगसंगतीद्वारे अर्थपूर्ण छायाचित्र
तयार करता यावे अशा प्रकारचे हे तंत्र आहे. ज्यांना कल्पनाशक्ती आहे पण तितके सुंदर
चित्र काही हाताने उतरत नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायला नको. त्यांची हौस आणि कधीकधी
तर व्यावसायिक गरज देखील अशा तंत्रानी पूर्ण होऊ शकते. जाहिराती
अक्षरलेखन (लेटरिंग) याला त्रिमितीचा आभास निर्माण करणे यात सहज शक्य आहे. अगदी खरं सांगायचं तर प्रत्यक्ष कागदावर चित्र काढण्याऐवजी एखाद्या टॅबलेट वर चित्र काढावे वा अनेक फ़ोटो आणि रंगसंगतीद्वारे अर्थपूर्ण छायाचित्र तयार करता यावे अशा प्रकारचे हे तंत्र आहे. ज्यांना कल्पनाशक्ती आहे पण तितके सुंदर चित्र काही हाताने उतरत नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायला नको. त्यांची हौस आणि कधीकधी तर व्यावसायिक गरज देखील अशा तंत्रानी पूर्ण होऊ शकते. जाहिराती
अक्षरलेखन (लेटरिंग) याला त्रिमितीचा आभास निर्माण करणे यात सहज शक्य आहे. अगदी खरं सांगायचं तर प्रत्यक्ष कागदावर चित्र काढण्याऐवजी एखाद्या टॅबलेट वर चित्र काढावे वा अनेक फ़ोटो आणि रंगसंगतीद्वारे अर्थपूर्ण छायाचित्र तयार करता यावे अशा प्रकारचे हे तंत्र आहे. ज्यांना कल्पनाशक्ती आहे पण तितके सुंदर चित्र काही हाताने उतरत नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायला नको. त्यांची हौस आणि कधीकधी तर व्यावसायिक गरज देखील अशा तंत्रानी पूर्ण होऊ शकते. जाहिराती, व्यंगचित्रे यांच्याबरोबरच काही फ़ार जुनी अगदी आपल्या आजोबा पणजोबांच्या काळातील छायाचित्रांना देखील या नवीन तंत्राने ताजेतवाने करता येईल.
अशी अद्ययावत तंत्र हाताशी असल्यावर माझ्यासारख्या नवशिक्या, हौशी कलाकारांची कल्पनाशक्ती देखील भरार्या मारु लागते. मग सृजनशील कलाकारांबद्दल काय सांगावे...! ©श्रेया श्रीधर महाजन. कॅलिफोर्निया . पूर्वप्रसिद्धी _या सख्यानो या- दिवाळी अंक ११ नोव्हेंबर २०१२
No comments:
Post a Comment